prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरीतील पेठवार्ड येथे ‘अनाथांचा बाप’ नाट्यप्रयोग संपन्न

ब्रम्हपुरीतील पेठवार्ड येथे ‘अनाथांचा बाप’ नाट्यप्रयोग संपन्न

0
150

बाजार समितीच्या उपसभापती सुनिता तिडके यांच्या हस्ते उद्घाटन

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

ब्रम्हपूरी शहरातील पेठवार्ड येथे सार्वजनिक हनुमान मंदिर समितीच्या वतीने संगीत- अनाथांचा बाप या तीन अंकी सामाजिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती तथा नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिता तिडके यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे नियोजन सभापती महेश भर्रे हे होते. उपाध्यक्ष म्हणून बाजार समितीच्या संचालिका तथा नगरसेविका अंजली उरकुडे, विनोद नवघडे यांची उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश राऊत, विनोदजी झोडगे, बाजार समितीचे माजी संचालक सुरेश दर्वे, सामाजिक कार्यकर्ते मामाजी वझाडे, अश्विन उपासे, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सोमेश्वर उपासे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर उरकुडे यांनी केले. नाट्यप्रयोगाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक हनुमान मंदिर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here