बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819
विधानसभा निवडणुकीत तीन राज्यामध्ये कमळ फुलले असल्याने व भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथे भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज डिगोळ चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.
चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून या निवडणुकीचा निकाल रविवारी बहुमताने लागला असल्याने या निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. या विजयाचा आनंद जल्लोष करण्यासाठी भाजपाचे शिरूर अनंतपाळ येथील तालुका सरचिटणीस माधवराव बिरादार व भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर चावरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिगोळ येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.
यावेळी बालाजीराव वाडकर, वसंतराव बिरादार, एकनाथ ककुरले.अंबादास पाटील, राहूल कांबळे, राजकुमार बिरादार, भाऊसाहेब बिरादार, ज्ञानोबा वाडकर, गोपाळराव वाडकर, राजकुमार आमनवाड, राहूल बिरादार, रामदास वाडकर, खंडेराव बोयणे, अप्पासाहेब बिरादार, बबलू बिरादार मछिद्र दासरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

