अनिता धूमकेतू गजभिये हे उपसरपंच पदी १० मतांनी जिंकले

0
78

दिलीप पृथ्वीराज गजभिये यांना ९ मते मिळाल्याने
वरठी येथील वर्तमान उपसरपंच अनिता गजभिये

मोहाडी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मोहाडी तालुक्यातील वरठी येथे आज दिनांक ०५/१२/२०२३ रोजी वरठी ग्रामपंचायत मधून उपसरपंच निवडणुकीसाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ५ सदस्यांनी माघार घेतली. उरलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदाचे उमेदवारांची नावे अनिता धूमकेतू गजभिये आणि मा. दिलीप पृथ्वीराज गजभिये या दोन्ही उमेदवारांना ०९ – ०९ अशी समान मते पडल्याने वरठी ग्रामपंचायत येथील सरपंच मा. चांगदेव रघुते यांनी दहावे मत म्हणून मा. अनिता गजभिये यांना दिले. परिणामतः एक मत जास्त मिळाल्याने वरठी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून मा. अनिता धूमकेतू गजभिये हे निवडून आले आहेत. ग्रामपंचायत सदस्य मा. दिलीप पृथ्वीराज गजभिये यांचा फक्त एक मताने पराभव झाला झाला असून सर्व ग्रामपंचायत सदस्य, जनतेचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांनी मा. अनिता धूमकेतू गजभिये यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच पराभूत उमेदवार मा. दिलीप पृथ्वीराज गजभिये यांनी सुद्धा विजयी उमेदवार मा. अनिता धूमकेतू गजभिये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून भविष्यातील पुढील राजकीय कारकिर्दीतील सुलभतेने वाटचाल करण्याच्या हेतूने शुभेच्छा दिल्या आहेत.
वरठी ग्रामपंचायत येथील सरपंच मा. चांगदेव रघुते यांनी अनिता धूमकेतू गजभिये यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून पुढील राजकीय कारकिर्दीतील वाटचाल सुलभतेने चालावी या हेतूने उपसरपंच मा. अनिता गजभिये यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत समिती मोहाडी येथील सभापती मा. रीतेश वासनिक यांनी देखील अनिता धूमकेतू गजभिये यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमसर विधानसभेचे आमदार मा. राजु कारेमोरे यांनी देखील मा. अनिता धूमकेतू गजभिये यांना उपसरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी देखील अनिता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here