
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्रम्हपूरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदचे बांधकाम सभापती विलास विखार, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता पारधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राजीव गांधी पंचायत राज संघटनचे महासचिव थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डी. के. मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, पटेलनगर प्रभाग काॅंग्रेसचे अध्यक्ष रवी मैंद, भास्कर सोनोने, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, शहर काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष लक्ष्मण जिभकाटे, सोमेश्वर उपासे, गीता मेश्राम, सुधा राऊत, गीता राऊत, सुरेखा गजभिये, जि. एस. सलामे, कु. वैष्णवी आमले, अमोल सलामे, मनोज शंभरकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपस्थित मान्यवर म्हणाले की, दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. संविधान निर्माता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला असे यावेळी सांगितले.














