prabodhini news logo
Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार युवकांनी स्मरण करून घ्यावे – आप शहराध्यक्ष...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार युवकांनी स्मरण करून घ्यावे – आप शहराध्यक्ष सुरज शहा

0
131

आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

भद्रावती- आज दि. 06 डिसेंबर 2023 रोजी परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टी भद्रावती च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आदरांजली अर्पित करण्यात आले. त्यावेळेस आम आदमी पार्टी भद्रावतीच्या शहराध्यक्ष सुरज शहा यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले की बाबासाहेबांचे विचार हे फक्त भारत देश पुरता नव्हे, तर संपूर्ण जगा साठी एक प्रेरणा आहे. बाबासाहेबांमुळेच भारताला रिझर्व बँक ऑफ इंडिया मिळाले. बाबासाहेबांमुळेच भारतातल्या महिलांना आज मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपतीच्या उच्च पदापर्यंत पोहोचता येते. सर्व युवकांनी व महिलांनी बाबासाहेबांचे विचार स्मरण केले पाहिजेत. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना बुक व पेन आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्टमंडळा कडून भेट देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकार, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभा कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, नयना गंधम, शहर सदस्य मंगेश खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशव पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here