कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या युवक काॅग्रेस विभागाअंतर्गत सिन्देवाही तालुका उपाध्यक्षपदी अक्षय पेटकुले यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रेरणेने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत युवकांच्या संघटनात्मक बांधनीसाठी सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली, महेन्द्र ब्राह्मणवाडे काॅग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली, सोनु नाकतोडे अध्यक्ष युवक काॅग्रेस ब्रम्हपुरी, रमाकांत लोधे तालुका काँग्रेस अध्यक्ष सिन्देवाही, स्वप्निल कावळे नगराध्यक्ष सिन्देवाही हे उपस्थित होते.

