सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर, दि. १० डिसेंबर २०२३: चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वालंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.
या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे रस्ता खराब झाला आहे. तसेच, या भेगांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी व भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी पहिल्यास लक्षात येते.
या प्रभागातील भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक व सभापती माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा मतदारसंघ आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
आम आदमी पक्षाने या रस्त्याला घेऊन आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या रस्त्याला भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हटले आहे. त्यांनी या रस्त्यासाठी माजी नगरसेवक तथा मनपा इंजिनियर यांना जबाबदार धरले आहे.
या प्रकरणी आम आदमी पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या वेळेस आम आदमी पक्षाचे नेते सुनिल मुसळे,जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार,महानगर अध्यक्ष योगेश गोखारे,चंद्रपूर युवा अध्यक्ष संतोष बोपचे,सह संगठन मंत्री सिकंदर सागोरे,सहसचिव सुधिर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्नील घागरगुंडे, उपाध्यक्ष सुनिल सदभय्या,जितेंद्र कुमार भाटिया सोबत परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

