भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे महान नेतृत्व असलेले डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहिली.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर आहिर, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, सुरेश तालेवार, दिनकर सोमलकर, राकेश बोमनवार, रोहित शेट्टी, अॅड. हरीश मंचलवार, गणेश रासपायले, विमल कातकर, चंदा ईटनकर, दुर्गा वैरागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी सांगितले की, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ‘एक राष्ट्र, एक विधान, एक निशाण’ या तत्त्वासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे कार्य आणि राष्ट्रभक्तीचे बळ आजही आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी ‘राष्ट्रासाठी बलिदान’ या विचाराने प्रेरित होऊन एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

