prabodhini news logo
Home उदगीर हेर येथे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

हेर येथे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

0
106

जि.प.प्रा.शाळा,डिग्रस ‘पवन ऊर्जा’ प्रकारात द्वितीय

बळीराम लांडगे
उदगीर तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

उदगीर दि.१२ हेर येथील निर्मलपुरी विद्यालयात शनिवार (दि.९) रोजी ५१ वे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकट बोईनवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्र प्रमुख राघोबा घंटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये ६ शाळांनी सहभाग नोंदविला होता.हे विज्ञान प्रदर्शन सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आले होते.सहावी ते आठवी गटातून हेर येथील निर्मलपुरी विद्यालयाचा विद्यार्थी माधव केंद्रे हा प्रथम तर जि.प.प्रशाला,डिग्रस येथील दत्ता गायकवाड,सैफ शेख द्वितीय व जि.प.शाळा,करखेलीचा सोमनाथ शिंदे तृतीय आला.तसेच नववी ते बारावी गटातून निर्मलपूरीच्या तृप्ती मिटकरी प्रथम,भाग्यश्री मिटकरी द्वितीय,व आरती मिटकरी तृतीय आले आहेत.या यशाबद्दल हेर येथील निर्मलपुरी विद्यालयच्या वतीने मार्गदर्शक व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींंचे विस्तार अधिकारी बोईनवाड,केंद्रप्रमुख घंटेवाड सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here