लोकनेते, विकास पुरुष मा.ना. विजय वडेट्टीवार
विजय पर्वाची यशोगाथा
संकलन
कपिल मेश्राम, सिंदेवाही
चंद्रपूर जिल्हा सीमेवरील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, व अतिदुर्गम अशी दूरवर गोंडपिपरी तालुक्याची ओळख आहे. याच गोंडपिपरी तालुक्यातील करंजी या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री व सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलेल्या एका असामान्य नेतृत्व, लोकनेते व विकासपुरुष अशी ख्याती असलेल्या नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या खडतर व संघर्षमय प्रवासाची ही यशोगाथा.
राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील करंजी ग्रामपंचायतचे सलग दोनदा सरपंच म्हणून विजय भाऊंचे वडील स्वर्गीय श्री. नामदेवरावजी वडेट्टीवार यांनी पद भूषविले. वडिलांचा हा राजकीय वारसा विजय भाऊंना चिरकाळ मिळाला नाही. बालपणी चौथ्या वर्गाचे शिक्षण घेत असताना विजय भाऊंच्या वडिलांचे निधन झाले आणि वडेट्टीवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरचा करता पुरुष गमावल्याने विजय भाऊंची आई कमलाताई यांना मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह याकरिता करंजी गावाचा त्याग करून गडचिरोली येथे माहेरी जावे लागले. भाऊ व बहीण यांचा आधार घेत माता कमलाईने कुटुंबाचा गाडा हाकतांना पोटच्या मुलांना शिक्षणासोबतच संस्काराचेही धडे गिरविले. हलकीच्या परिस्थितीत मुले मोठी होत गेली व मिळेल ते काम करू लागले. यातच तारुण्यवस्थेत पदार्पण करतात विजय भाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील भरकटलेली युवा पिढी यांना उच्चशिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध नोकऱ्यांची संधी मिळावी याकरिता शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत रोजगार संबंधीची माहिती प्रकाशित करणारे वृत्तपत्रे अतिशय दुर्गम भागापर्यंत पोहोचवून तेथील युवकांना प्रशासकीय यंत्रणेत सहभागी होण्यासाठी नक्षलांच्या आव्हानांना तोंड देत सक्षमपणे भूमिका पार पाडली. एक धाडसी व धडाडीचे नेतृत्व म्हणून शिवसेनेत विजय भाऊंची एन्ट्री ही त्यांच्या राजकीय जीवनाची पहिली पायरी होय. दमदार आवाजातील भाषण प्रशासकीय यंत्रणे कडून काम करून घेण्याची पद्धती व गोरगरिबांसाठी त्यांची असलेली तळमळ पाहून शिवसेना पक्षात त्यांची पार्टी अधिक जड झाले व याची दखल देखील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतली. अशाच तारुण्यवस्थेत त्यांचा प्रेम विवाह वहिनीसाहेब म्हणजे किरण ताई विजयराव वडेट्टीवार यांच्याशी झाला. किरण ताईंनी देखील विजय भाऊंना संसाराच्या पदरात बांधून न ठेवता गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढावयास एक प्रेरणास्त्रोत पत्नी या नात्याने वेळोवेळी साथ दिली. विजय भाऊंचे गडचिरोली जिल्ह्यात वाढते राजकीय साम्राज्य व त्यांच्या आंदोलने व पक्षासाठी असलेली हीरीरी याची दखल घेत राज्यात शिवसेनेची सत्ता असताना त्यांची सन 1991-98 या कार्यकाळात वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या पदावर असताना देखील जनतेशी नाळ जोडलेल्या विजुभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कामगार व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी सलोख्याचे संबंध जोपासत त्यांच्या समस्यांना मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने उभारली. विजय भाऊंच्या या कार्यांची वर्तमानपत्रातून होणारी प्रसिद्धी व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून होणारी कौतुक पाहून पक्षश्रेष्ठींनी विजय भाऊंच्या गळ्यात विधान परिषदेची माळ घालून आमदार म्हणून नियुक्ती केली. आणि हीच सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्वाचा राज्याच्या राजकारणात अरुणोदय झाला. यानंतर मात्र विजय भाऊंच्या अग्नि परीक्षेचा खडतड प्रवास सुरू झाला. तो असा की गडचिरोली जिल्हा सोडून त्यांना चिमूर विधानसभेतून थेट जनतेतून आमदारकीसाठी पोटनिवडणूक लढावी लागली. मात्र कोळशाच्या खाणीतही हिरा जसा लखलखतो अगदी त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील हे असामान्य नेतृत्व थेट क्रांती भूमीत शिवसेनेची मशाल घेऊन संघर्षाने लढले व प्रस्थापितांना हादरा देत निवडूनही आले. या संघर्षमय विजयाचे सुरू झालेले पर्व येथेच थांबले नाहीत तर सलग दुसऱ्यांदा ही चिमूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवून विजय भाऊंनी राज्यमंत्री पदापर्यंत आगेकूच केली. यानंतर मात्र विजय भाऊंनी काँग्रेसचा हात स्वीकारून अगोदर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अध्यक्ष म्हणून त्यानंतर ब्रह्मपुरी विधानसभेतून सलग दोनदा आमदार म्हणून निवडून येत राज्याचे इतर मागास कल्याण, खार जमिनी विकास, तथा आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सन 2019 मध्ये महाविकास आघाडी स्वरूपाने महाराष्ट्रात सत्ता येतात कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले. अशा विदारक व जीव घेण्या गंभीर आजाराला समर्थपणे तोंड देण्यासाठी त्या वेळचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून विजय भाऊंनी जीवाची परवा न करता राज्यातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत कोरोना या महाभयंकर आपत्ती विरोधात यशस्वी लढा दिला. कालांतराने महाविकास आघाडीत पडलेली फुट यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीत प्रमुख दोन पक्षांच्या आमदारांनी सत्तेसाठी भाजपाला समर्थन देऊन पक्षद्रोह केल्याने व काँग्रेस पक्ष हा विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरल्याने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी पुन्हा एकदा विदर्भाचा ढाण्या वाघ अशी ख्याती प्राप्त असलेल्या राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपविली. आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याचा राज्याच्या कॅबिनेट मंत्री ते विरोधी पक्षनेते पदापर्यंतचा प्रवास आजचा गायक यशस्वीरित्या सुरू आहे.
सहृदयी नेते विजय वडेट्टीवार…..
गडचिरोली या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातून राजकीय जीवनात सुरुवात करणाऱ्या विजय भाऊंनी ज्या क्षेत्रात अथवा मतदारसंघ व इतरत्र ही फिरताना जे दुखी, गरजू, पिढीत, शोषित यांनी ज्या ज्या वेळेस विजय भाऊ पुढे आपल्या व्यथा मांडल्या त्या त्यावेळेस विजय भाऊंनी क्षणाचा ही विलंबना लावता फुल ना फुलाची पाकळी देऊन आपल्या दारातून आलेल्या प्रत्येकाला हताश व निराश न करता रिकामा हाती कधीही परतविले नाही. गरजवंतांना यथाशक्ती सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आपल्या सहृदयतेचा परिचय दिला.
जनसेवक ते रुग्णसेवक विजयभाऊ….
जनसेवा व रुग्णसेवा ही ईश्वरीय सेवा आहे. असे मानून जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारे राजकारणात फार क्वचितच नेते आहेत. अशाच पैकी एक असलेले विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मतदारसंघात व जिल्ह्यातील त्यांना वेळोवेळी भेटणारे कर्करोग आजार ग्रस्त रुग्ण व या आजारामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेले आर्थिक संकट तसेच जीव गमावण्याचे संकट लक्षात घेत पूर्वीच्या काळात हजारो रुग्णांना उपचाराकरिता आर्थिक मदत देऊन तसेच विनामूल्य उपचार मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला. तर कालांतराने विजय किरण फाउंडेशन मार्फत अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून कर्करोगाचे पूर्वीच निदान करणारे सुमारे अडीच कोटींची वाहन तयार करून फिरते दवाखाना च्या माध्यमातून अनेक कर्कग्रस्त रुग्णांचे निदान करीत मोफत उपचारातून आज शेकडो लोकांचे प्राण वाचविण्याचे यशस्वी प्रयत्न चालू आहेत राज्यातील या पहिल्या प्रयोगातून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला. मोफत रुग्णवाहिका ,सोबतच 0 ते 10 वयोगटातील जन्मतःच हृदयाला छिद्र असणाऱ्या पालकांवर तपासणी, उपचार व मुंबई येथील नामवंत रुग्णालयात शस्त्रक्रिया,अशी मोहीम राबवून महागड्या खर्चा अभावी मृत्यूची झुंज देणाऱ्या अनेक बालकांचे प्राण वाचविले.सोबतच डोळे तपासणी शिबिरे तथा मोफत चष्मे वाटप कार्यक्रम, अशा अनेक कार्यक्रमातून लाखो लोकांना दृष्टी देण्याचे पवित्र आणि निस्वार्थ कार्य विजय भाऊंनी चालविले. व सध्या काळातही सुरूच आहे.
विजयभाऊंच्या विकासाचा झंजावात….
राजकारणात विजय भाऊंचा दरारा निराळाच आहे. जनसामान्यांच्या समस्यांना घेऊन लोकप्रतिनिधी नसताना आंदोलने केली. व जनतेच्या समस्यांना घेऊन पेटून उठले. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले व जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता जनतेच्या विश्वासावर खरे उतरत ते विधानसभेचे सभागृह असो की मुख्यमंत्र्याचे दालन अगदी प्रखरपणे जनतेची बाजू मांडून जनतेच्या समस्यांना सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या मतदारसंघासह मंत्री असताना व विरोधी पक्षनेते पदाचा पदभार सांभाळताना विकास कामे यावर भर देऊन आपल्या विकासाचा झंजावात कायम राखला. वर्षानुवर्षापासून पकडलेले पूल ,रस्ते, रोजगाराची समस्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयींची उपलब्धता, आरोग्य सेवा, प्रवास सेवा, शेती सिंचनासाठी पाण्याची मुबलक सोय, युवा पिढींना दिशा देणारे विविध मार्गदर्शक कार्यक्रम आधी राबवून विकासासह प्रचंड अशा क्रांतीची मूहूर्त मेढही विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केली.
ओबीसींची बुलंद तोफ विजय वडेट्टीवार…..
राज्यात सर्वत्र आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आंदोलने सुरू आहेत. अशातच इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये या भूमिकेवर ठाम राहुल संपूर्ण राज्यातील ओबीसींची प्रकल्पाने बाजू मांडणारे विजय भाऊ वडेट्टीवार हे ओबीसी समाजातील प्रत्येक नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले होते त्यावेळेस महा विकास आघाडीची सत्ता हसताना कॅबिनेट मंत्री असलेले विजय भाऊ यांनी ओबीसींचा एम्पिरिकल डाटा गोळा करून अहोरात्र मेहनत घेत प्रचंड असा न्यायालयीन लढा लढला. याची फलित म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांना 19 टक्के आरक्षण मिळाले. तर राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध समाजाच्या आंदोलनांमुळे सध्याच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून अशा बिकट परिस्थितीत ओबीसींची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्या समाजाला आरक्षण नक्की द्या मात्र ओबीसींच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी अन्यथा ओबीसी समाज पेटून उठेल. असा सज्जड दम देत सरकारला धारेवर धरत आपली प प्रखर भूमिका मांडली. यामुळे ओबीसी समाजाला प्रचंड बळ मिळाले असून राज्यातील नवा ओबीसी चेहरा म्हणून विजय भाऊंच्या पाठीशी ओबीसी समाज खंबीरपणे उभा आहे.
“महाज्योती’ अंतर्गत विजय भाऊंचे ऐतिहासिक निर्णय ….
महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे माजी इतर मागास कल्याण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतात विजय भाऊंनी राज्यातील इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त भटक्या जाती जमाती यांचे करिता विशेष असे ऐतिहासिक निर्णय घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेतू व्हींजे, एन टी प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करून अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून दिले. सोबतच मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजना, वैमानिक होण्याचे स्वप्नपूर्ती करिता विशेष प्रशिक्षण, व अन्य असे अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्याला एक विकासाभिमुख दिशा देणारा कर्तबगार हरहुन्नरी,चतुरस्त्र विचारसरणीचा नेता लाभला असे भावोद्गार अनेकांच्या मुखातून एकावयास आजही मिळते आहे.
लेखक – वेदांत व्ही. मेहरकुळे

