ब्रम्हपुरी प्रतिनिधी
माता रमाई वर वधु सुचक केंद्र ब्रम्हपुरी यांच्यातर्फे निःशुल्क बौद्ध धर्मीय उपवर वधु परिचय मेळावा नुकताच म्हणजे दि. 27/11/2023 ला शोभाताई मीटिंग हाल सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रम्हपुरी या ठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. प्रेमलाल मेश्राम उद्घाटक प्राचार्य डॉ. देवेश कांबळे प्रमुख अतिथी प्राध्यापक संतोष रामटेके, इंजिनिअर मोहन नंदेश्वर, एडवोकेट दिलीप कुमार माटे, एडवोकेट आशिष गोंडाणे, माननीय अमित गोस्वामी पञकार प्रशांत डांगे, माननीय लीलाधर वंजारी, पञकार अनिल कांबळे, प्रीती हुमणे, या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या उपवर वधु यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या ठिकाणी ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड, नागपूर, देवरी, वर्धा, अर्जुनी, अहेरी, तसेच या परिसरातील खेडेगावातील सुध्दा उपवर वधु हाजर होते. या मेळाव्यामध्ये 102 लोकांनी नोंदणी केली या उपवर वधु यांचे आई-वडील, बहीण त्यांचे नातेवाईक त्यांच्यासोबत आले होते. हा मेळावा निःशुल्क असल्यामुळे बरेच उपवर वधु यानी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी व मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व बंधु आणि भगिनींची गर्दी केली होती, हा मेळावा यशस्वी करण्याकरिता रमेश बागडे, घनश्याम रामटेके, अरुण घुटके, मंगल पल्लेदार, अनिल कांबळे, लीलाधर वंजारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पञकार आयु अनिल कांबळे यांनी केले.

