प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
गडचिरोली- दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी मौजा पोटेगांव ता. जि. गडचिरोली येथे नवयुवक मंडळ पोटेगांव यांच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी प्रेक्षकांना सद्य आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीबाबत अवगत करतांना समाजातील विघटनवादी प्रवृत्ती पासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, सह अध्यक्ष तालुका काँग्रेस सचिव श्रीनिवास ताडपल्लीवार, युवक काँग्रेस प्रत्येक सचिव विश्वजीत कोवासे, माजी तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी विभाग कार्यकारी जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसंतराव राऊत, ढीवरुजी मेश्राम, माझी पंचायत समिती सदस्य मालता मडावी, सरपंच अर्चनाताई सुरपाम, कांता हलामी, विनोद मडावी, उपसरपंच नरेंद्र मोहुर्ले, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

