गीतेतून मिळणारे ज्ञान जीवनाला दिशा देणारे- सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोहितकर
भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भद्रावती – आज दिनांक 22 डिसेंबर गीता जयंतीचा योग साधून स्थानिक गणेश मंदिर येथे सकाळच्या प्रसन्न प्रहरी भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे श्री. स्वराज्य वीर संघटनेच्या वतीने सामूहिक पठण करण्यात आले.
माणव जातीला शिक्षणाबरोबरच संस्काराची नितांत गरज असून भगवद्गीतेकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून न बघता जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षणी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा आणि जीवन पुरुषोत्तम बनविणारा हा दिव्यग्रंथ असल्याचे प्रतिपादन संघटनेचे मुख्य मार्गदर्शक स्वप्निल मोहितकर यांनी केले.
सदर कार्यक्रमात श्री. स्वराज्य वीर संघटने कौतुक करीत हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना, युवकांना योग्य संस्कार देणारा असल्याचे मत जनतेनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

