वडसा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
वडसा- दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी मौजा कढोली ता. वडसा जि. गडचिरोली येथे आयोजित “माणसातील देव माणूस” या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी सदर नाटकात काम करणाऱ्या स्थानिक कलावंतांचें कौतुक केले. स्थानिक कलावंतानी सदर केलेली कला ही उत्तम असून त्यांनी रंगमंच कला जोपसण्याचे काम केलेले आहे असे ते म्हणाले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती पारसरामजी टिकले, किशोरजी तलमले, रामदासजी मसराम, चांगदेवजी फाये, पी. आर. आकरे, चवारे गुरुजी व मोठयासंख्येने उपस्थित होते.

