
निशा सोनवणे
कोकण वि. संपादक
प्रबोधिनी न्युज
विद्याविहार वेस्ट कीरोळ गाव येथील रिक्षा स्टँड वरील होणाऱ्या बाहेरून येणाऱ्या गुंडशाहीचे प्रवृत्तीचे मारहाण करणाऱ्यांसाठी समस्या चे मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार.. प्रदिप गौतम साळवे (घाटकोपर तालुका अध्यक्ष) व चंदन वसंत निकाळजे (घाटकोपर तालुका अध्यक्ष वं. ब.आ) यांच्या अथक प्रयत्नांतून विद्या विहार स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक येथे सभागृह मध्ये रिक्षा स्टँड वरील मुजोर रिक्षा चालक ज्यांचे परमिट, ब्याच, लायसन्स नाही जे रिक्षा स्टँड वर दादागिरी करून मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीच्या रिक्षा चालक यांच्या विरोधात स्थानिक पोलिस बीट अधिकारी लालासाहेब डाके (सहायक पोलिस निरीक्षक) यांच्याशी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये उपस्थित स्थानिक रहिवाशी व कार्यकर्ते किरण कांबळे (अध्यक्ष). राजू तांबे (तालुका सचिव वं.ब.आ) मकसूद शेख, पुष्पा चव्हाण, मीना शिल्डणकर, सुजाता तांबे, महादेव तांबे, किरण कांबळे, प्रशांत अडसूळ, विनोद गायकवाड, अश्विन जाधव, महिंद्र सकपाळ, अनिल सकपाळ, साईनाथ भालेराव, सुभाष धनाजी. यांच्या समवेत ही बैठक पार पडली व तसेच बाहेरून येणारे गुंड प्रवृत्तीच्या मुजोर रिक्षा चालक यांच्या विरोधात स्थानिक पोलिस अधिकारी यांना योग्य ती कारवाई करावी.तसेच घाटकोपर पोलिस ठाणे येथील बीट अधिकारी ३ चे सहायक पोलीस निरीक्षक… लालासाहेब डाके यांनी मोलाचं मार्गदर्शन करून योग्य ती कारवाई करू अशी अपेक्षा व्यक्त केली.














