prabodhini news logo
Home चंद्रपूर आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे “अत्याचार” नाटकाचे आयोजन

आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे “अत्याचार” नाटकाचे आयोजन

0
448

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

अशोका स्पोर्टिंग क्लब ग्राउंड, आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे सिध्दार्थ नाट्य मंडळ आंबेडकर नगर, बाबुपेठ यांच्या वतीने दिनांक २६/१२/२०२३ रोज मंगळवार ला रात्रौ ८-०० वाजता माई नाट्य संपदा वडसा निर्मित ‘अत्याचार’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उदघाटक म्हणून मा. प्रतिभा धानोरकर आमदार भद्रावती -वरोरा विधानसभा क्षेत्र तर अध्यक्ष म्हणून मा.सुधाकर आंभोरे साहेब राहणार आहेत.
या नाटकाचे दिग्दर्शन मा. सिने. नरेश गडेकर तर नाटकाचे लेखक-धनंजय ढवळे हे आहेत. यातील मान्यवर कलावंत सिने. नरेश गडेकर, संतोषकुमार, उमेश जाधव, अमरकुमार मसराम, प्रा. संतोष बारसागडे, रत्नदीप रंगारी, गीरी फटाले, आसावरी तिडके, निशा धोंगडे, मुस्कान, पुजा हे असणार आहेत. माई नाट्य संपदा गृप चे निर्माता मिलिंद येनगंटीवार असून दर्जेदार व प्रबोधनात्मक नाटक सर्व कुटुंबासोबत पहावं असं आवाहन आयोजक संतोष बारसागडे व सचिन मानकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here