बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
खालापूरी येथील कुस्त्यामध्ये पैलवान लोकांना जात,धर्म आणि पक्ष बघून बक्षीस रक्कम वाटप केल्याचं उघड झाल आहे. जवळच्या लोकांना जास्तीच आणि दूरच्या लोकांना कमी रुपये दिली गेली.काही लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या . गावातील पैलवान क्षेत्रातील परिसरात मोठ आणि नावाजलेले नाव असणाऱ्या दिगंबर भाऊ गवळी यांच्या मुलाचा म्हणजे अमर गवळी याचा सलग तीनदा सुवर्ण पदक मिळूनही गावाच्या हगाम्यात त्याचा साधा सत्कार होत नाही ? इसाक भाई यांचा मुलगा सोहेल शेख आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असूनही त्याचा ही सत्कार गावाच्या हगाम्यात होत नाही ? अरे चाललंय तरी काय ? कुठ नेवून ठेवली आपली खालापूरी..! कोणतरी आपला तुझा ह्याचा त्याचा करत आहे. वर्गणी तर सगळ्यांकडून घेतो मग हा दूजाभवा का ? ज्याचा सन्मान त्याला द्यायलाच पाहिजे.कोणी ग्रपांचायत ची खुर्ची घेतली म्हणून संस्कार झाल्याप्रमाणे मनुवादी वृत्तीने वागू नये.गाव आमचा आहे, एकोपा आम्ही जपणार पण सत्ता आली म्हणून मग्रुरी कोणी करत असेल तर खपऊन घेतली जाणार नाही.पैलवान अमर गवळी,पैलवान सोहेल शेख यांचा सत्कार करून गावात सर्व धर्म समभाव प्रस्थापित करा.नसता तुमच्या बुध्दीत मनुवादी घाण तशीच आहे हे कबूल करा.जे लोक गावच नाव उंच करू पाहत आहेत त्यांना योग्य सन्मान दिला गेला पाहिजे तो गाव प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून होत नसेल तर हे पाप कधी ना कधी तुम्हाला हनुमंतराया चरणी फेडाव लागेल, नगद नारायण याला माफ करणार नाही.आमच्या माळ्याच,मुसलमानच पोरं चांगलं खेळलं इमानदारीने खेळलं तरीही त्याच हितगुज तुम्हाला नसेल तर तुम्हीही गेलात उडत…! गोर गरीब वंचित उपेक्षित दिन दलीत दुबळ्या साठीच हा सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर काम करेल आणि त्यांना त्यांचं हक्काचं मिळवून देईल सत्ता कोणाच्या ही बापाची असो सत्य,निरपेक्ष आणि समानता यासाठीच अविरत काम करणार आणि न्यायासाठी लढणार- मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर

