10 हजार काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी गडचिरोली जिल्ह्यातून होणार नागपूर च्या सभेत सहभागी
रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
गडचिरोली – दि. 28 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वर्धापण दिनानिमित्त नागपूर येते भव्य सभा पार पडणार आहे. या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाअर्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी सह काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष सह 10 लक्ष काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या सभेत गडचिरोली जिल्ह्यातूनही 10 हजार काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार असून या संदर्भात गडचिरोली विधानसभेची नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम भवन, गडचिरोली येते पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहरअध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी मिलिंद खोब्रागडे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव. मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, परिवाहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, पांडुरंग घोटेकर, शंकरराव सालोटकर,प्रशांत कोराम, राजाराम ठाकरे, सुभाष धाईत, भैयाजि मुद्दमवार, श्रीनिवास ताटपल्लीवार, योगेंद्र झंजाळ, कमलेश खोब्रागडे, आय. बी शेख, दिपक रामने, अनिल कोठारे, लालाजी सातपुते, राजाभाऊ कुकुडकार, रोहिदास दुमाने, महेश चौधरी, श्रीकांत काथवतटे, रामभाऊ नन्नावरे, उमेश भांडेकर, ढिवरू मेश्राम, लालाजी सातपुते, लक्ष्मण मेश्राम, लोमेश भांडेकर, संतोष गव्हारे, साहिल वडेट्टीवारं, कल्पना नंदेस्वर, गीता गोवर्धन, अपर्णा खेवले, नीलिमा मडके, आशा मेश्राम, लता मुरकुटे, उमेश भांडेकर माजिद सय्यद सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळीस उपस्थित होते.

