
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे- दि. 24 डिसेंबर 2023 रोजी कवयित्री संगीता राजेश नागदिवे, यवतमाळ यांच्या हळवे गुंजन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन धर्मवीर शंभूराजे सांस्कृतिक भवन हडपसर पुणे येथे कल्याणकारी काव्यसमूह साहित्य संमेलन 2023 मध्ये प्रकाशन झाले.
रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी समूहाचे संस्थापक प्रा. कल्याण राऊत, संस्थेच्या अध्यक्षा मा. कोमल कल्याण राऊत लातूर, संमेलनअध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय सुधाकर झिंगाडे उमरगा, कवीसंमेलन अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम हिंगणकर अकोला, प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे, देशमुख पुणे, मा.मारुती आबा तुपे, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन संपन्न झाले.या संमेलनाला महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक आवर्जून उपस्थितीत होते. संगीता नागदिवे यांनी हळवे गुंजन हा कवितासंग्रह कोविड-19 च्या काळात लिहिलेला आहे.

त्यांच्या काव्यसंग्रहात सुरुवातीला कोरोनावरील कविता असून कवितेमधून त्यांनी स्त्रियांना प्रेरणा दिली आहे. तसेच इतर सामाजिक विषय काव्यसंग्रहात घेतले आहे. हळवे गुंजन या कवितासंग्रहाला नागपूरचे वाय.सी.सी कॉलेजचे प्रा. प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र गिमोणकर यांची प्रस्तावना आहे. तर या काव्यसंग्रहाला कुरखेड, जि. गडचिरोली च्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या लेखिका, कवयित्री शेतकरी भगिनी मा. संगीता संतोष ठलाल यांनी शुभेच्छा दिल्या आहे. हळवे गुंजन चे समीक्षण मेहेकर येथील प्रसिद्ध संपादक आणि प्रसिद्ध संत वांग्मयाचे अभ्यासक मा.भगवान राईतकर यांनी केले .या प्रकाशन सोहळ्याला त्यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. हळवे गुंजन हा काव्यसंग्रह सर्वांनी वाचावा अशाच कविता या संग्रहात आहे.














