prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापुरातील बौद्ध धम्म मेळावा सपंन्न..

रत्नापुरातील बौद्ध धम्म मेळावा सपंन्न..

0
175

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

धम्मभूमी विकास सेवा समिती उमा नदीघाट,शिवणी रोड येथे रत्नापूर, शिवणी व नाचनभट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धम्म मेळावा नुकतेच संपन्न झाले. या धम्म मेळाव्यातील पहिल्या सत्रात मुळावा (यवतमाळ) येथील भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते व भदंत धम्मानंद केशोरी यांच्या उपस्थितीत धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे डॉ. राजपाल खोब्रागडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे सचिव प्रा. गौतम डांगे, धम्मभूमी विकास सेवा समितीचे अध्यक्ष सदाशिव मेश्राम, उपाध्यक्ष नामदेव खोब्रागडे, धनोज खोब्रागडे, आदी उपस्थित होते. उपस्थित नागरिकाना प्रा.गौतम डांगे यांनी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रामध्ये बुद्धभीम गीतांवर सांस्कृतिक एकल व समूहनृत्य स्पधा घेण्यात आली. यामध्ये विजयी स्पर्धकांना रोख रक्कम बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी साठी धम्मभूमि विकास सेवा समिति तील सर्व पधाधिकारी, सभासद ,रत्नापुर ,शिवणी, नाचनभट्टी येथील बौध्द बांधव यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here