बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची विशेष उपस्थिती
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
ब्रम्हपुरी- तालुक्यातील मालडोंगरी येथे यारी दोस्ती ग्रुप, मालडोंगरी यांच्या सौजन्याने कबड्डी प्रेमिंसाठी भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद ब्रम्हपुरी तालुक्यातील किरमीटी गावातील संघाने मिळविले आहे. तर मालडोंगरीच्या संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागले. तृतीय क्रमांक नांदगाव जाणी येथील संघाने मिळविले आहे तर चतुर्थ क्रमांक अर्हेरनवरगाव येथील संघाने पटकावले आहे.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोषजी मिसार बँक मॅनेजर, गणेश घोरमोडे ठेकेदार, सचिन ठेंगरी, विनोद ठेंगरी, भोजराजभाऊ राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील खेळ आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनविण्यासाठी अश्या स्पर्धांचा खूप मोठा वाटा असतो. कबड्डी स्पर्धेमुळे तरुणांमध्ये जो उत्साह, जिद्द आहे. ती अशीच कायम असली पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी यारी दोस्ती ग्रुप, मालडोंगरीचे सदस्य मयूर चौधरी, सोपान कुत्तरमारे, आकाश बरडे, भूषण चौधरी, जतिन देशमुख, अमीत ढोरे, सौरभ पिलारे, आशिक ठेंगरी, मुन्ना पारधी, प्रतीक चौधरी, स्वप्नील नागमोती, विवेक शेंदरे, राधेश्याम मैंद, डेविड ठाकरे, अंकुश ठाकरे, मयूर सहारे, गोपाल समर्थ व अन्य सदस्यांनी मेहनत घेतली.

