prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापुर जिल्हा परिषद शाळेकडून समतादुत कृपाली धारणे यांचा सत्कार

रत्नापुर जिल्हा परिषद शाळेकडून समतादुत कृपाली धारणे यांचा सत्कार

0
189

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांचा सत्कार

कपिल मेश्राम
सिंदेवाही

भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका, स्त्रियांच्या उद्धारकर्त्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रत्नापुर जि. प.उच्च प्राथमिक शाळा येथे साजरी करण्यात आली.यावेळी सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.त्या नंतर सत्कार मूर्ती समतादुत कृपाली धारणे यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यांचा सत्कार करण्यात आला .तसेच शाळेचे विशेष कार्य म्हणजे त्यांनी शाळेतील स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णा सर्व मुलांना शालेय पोषन आहार बनवून पोट भरून मुलाना जेवण देणाऱ्या इंदिरा बाई आणि पुष्पाबाई गळमळे यांचा सुद्धा सत्कार केला.
त्याचं प्रमाणे ऐक नावीन्य उपक्रम शाळेने राबविला होता .सावित्रीबाई फुले जयंती हि बालिका दिन म्हणून साजरी केले जाते. जि. प. शाळेतील मुली सावित्री च्या वेशभुषा करून आल्या होत्या.

या कार्यक्रमाला या प्रसंगी समतादुत कृपाली धारणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित मान्यवरानी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रत्नापुर जि. प.शाळेच्या मुख्यद्यापिका रेखा पंधरे होत्या, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उषा धारणे ग्रामपंचायत सदस्य, माया लोधे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मिथुन रामटेके तर आभार सोमेश्वर आत्राम यांनी मानले.कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक चंदा गुडवार, वैशाली कोवले, विकास राजूरकर, दिनकर गायकवाड, प्रदीप बद्देलवार,मोतीराम सोंनकुसरे, मंगला कवाडे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here