prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापुरात नागदिवाळी वार्षिकोत्सव संपन्न

रत्नापुरात नागदिवाळी वार्षिकोत्सव संपन्न

0
212

माँ. माणिकादेवी आदिवासी चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजन

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

माँ. माणिकादेवी आदिवासी चॅरिटेबल ट्रस्ट रत्नापुर च्या वतीने मानिकगडावर दोन दिवसीय नागदिवाळी उत्सव नुकताच साजरा करण्यात आला.
पहिल्या सत्रात गावातून सांजवात व दीप घेऊन शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर बाबीरावजी वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रावण सावसाकडे यांच्या उपस्थीतीत मूठपूजा, खनपूजा व वृक्षारोपण करण्यात आले. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ वाकडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय सतई, मंगला पाटील, बार्टीच्या कृपाली धारणे, माँ माणिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष विश्वनाथ सावसाकडे, माजी सरपंच कविता सावसाकडे, उपाध्यक्ष श्रीहरी भरडे, सचिव वासुदेव दडमल, चंद्रशेखर नन्नावरे, महादेव चौधरी, विनायक गायकवाड, प्रशांत दडमल आदी उपस्थित होते. मंगलाताई पाटील, संजय सतई यांनी रत्नापूर हे गाव दत्तक घेऊन आदर्श करण्याचे ठरविले.

कार्यक्रमाचे संचालन सुप्रिया नन्नावरे,आभार प्रदर्शन पल्लवी गायकवाड़ हिने केले. कार्यक्रमाच्या यसस्वीसाठी वासुदेव दडमल, अंकुश सावसाकड़े,प्रशांत दडमल यांनी योगदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here