prabodhini news logo
Home उदगीर ‘डेंजर’ हंडरगुळी येथील मेडीकल स्टोर्स चालतात “फार्मसिस्टविना” कारवाईसाठी होतेय “टंगळमंगळ”

‘डेंजर’ हंडरगुळी येथील मेडीकल स्टोर्स चालतात “फार्मसिस्टविना” कारवाईसाठी होतेय “टंगळमंगळ”

0
311

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

उदगीर शहरानंतर सर्वात मोठे व राज्यमार्गा शेजारी असलेल्या हंडरगुळी येथे असलेल्या मेडीकल दुकाणांपैकी कांही दुकाणामध्ये पदविधारक असा फार्मसिस्ट न बसता अन्य लोकचं हे “डुप्लिकेट फार्मासिस्ट” दुकाणे चालु- बंद करतात.व औषधी ही देतात.अण् हा सगळा प्रकार पशु,पक्षी,व गुरांसह मनुष्यांच्या आरोग्यासाठी “डेंजर”असे आहे.आणि कोणत्या मेडीकल मध्ये फार्मासिस्ट नसतात.याची सगळी माहिती असुन ही सं.अन्न व औषध प्रशासन खात्याचे D.I.हे जाणुनबुजुन “टंगळमंगळ” करत असतात.तेंव्हा या गावातील फार्मासिस्टविना चालणारे मेडीकल स्टोर्सवर D.I. ड्रगईन्सपेक्टर हा कारवाही करणार कधी.एखाद्या रुग्णांचा जीव गेल्यावर का.असे प्रश्न हाळी हंडरगुळीसह परिसरातील तज्ञ मंडळीतुन विचारला जात आहे.. पशु,पक्षांसह मनुष्यांच्या आरोग्याच्या हितासाठी औषधांचा दर्जा व डाॅक्टर मंडळींनी दिलेल्या चिठ्ठीनुसार औषधे देणे बंधनकारक व अत्यंत म्हत्वाचे असते.व यात डिग्री होल्डर असलेल्या फार्मसिस्टची भुमिका अहम म्हत्वाची असते.तरी पण येथील बहूतांश औषधे हे डाॅक्टरनी लिहून दिलेली न देता दुस-या कंपनीचे “सबस्ट्यूड” देतात.तरी ही औषधी डाॅक्टर्स मान्य करतातच कशी.तसेच फार्मासिस्ट — विना चालणा-या औषधी दुकाणांची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या XLN एक्सएलएन पोर्टलवर आहे.व D.I.Off लातुर येथे असे XLN पोर्टल नाही.का ? असेल तर मग हंडरगुळी येथील किती मेडीकल स्टोर्स डीफाॅर्म, फार्मासिस्टविना चालतात ? याची नोंद घेऊन D.I. कारवाही करायची “डेअरींग” दाखवेल का ? असे प्रश्न परिसरातील जाणकारांतुन चर्चीले जातात.फार्मासिस्टच्या उपस्थिती शिवाय कुणालाही औषधे देऊ नये. असे कायद्यात आहे.व फार्मासिस्ट विना औषधी विक्री होत असल्यास याची तत्काळ आॅडिट करणे गरजेचे आहे.व या कालावधित किती औषधे विकली गेली,त्यांची नोंद ठेवण्यात आली होती का.तसेच फार्मासिस्ट शिवाय वर्षानुवर्षापासुन चालणा-या हंडरगुळीच्या मेडीकल स्टोर्सवाल्यांना आर्शिवाद देणा-या संबंधित D.I. ड्रग ईन्सपेक्टरचा “फायदा” काय?तसेच फार्मासिस्टविना चालणा-या आणि रुग्णांचे आयुष्य “डेंजर झोन” मध्ये घालणा-या औषधी दुकाणांवर कधी कारवाही करणार?कांहींचा जीव गेल्यावरच कारवाही करणार का ? असे प्रश्न हंडरगुळीसह परिसरातील जाणकारातुन चर्चीले जातात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here