



कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सामाजिक न्याय विभागाचे स्वास्थ्य संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे च्या वतीने स्व. बालाजी पाटील बोरकर जुनिअर कॉलेज नवरगाव येथे युवा दिन तसेच राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर समतादूत कृपाली धारणे यांनी विद्यार्थ्यांना युवा दिनाचे महत्त्व, स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यामध्ये सर्व जगाला जगभर अध्यात्म पसरवला यावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे मासाहेब जिजाऊ यांनी शिवबा कसा घडवला यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय करायचे यावर सखोल असं मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य दुष्यंत बनसोड सर होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण सोनवणे सर तर आभार प्रा. वाघे सर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृंद उपस्थित होते.














