सिंदेवाही -लोनवाही नगर पंचायतमध्ये महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम

0
175

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही

मकरसंक्रांत निमित्त सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत मध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीनाक्षीताई मेश्राम यांच्या नेतृत्वात मकर संक्रांती निमित्य हल्दी कुंकू च्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमत सिंदेवाही शहरातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस, आणि नगरपंचायत च्या सफाई कर्मचारी महिला,सर्व आजी माजी नगरसेविका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला मान.राजश्री वासके मॅडम, डॉ. अमृता बदनोरे,ऍड प्रतिभा मोहुर्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी मान्यवर मंडळींनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांचे संघटन ही काळाची गरज असून महिलांनी केवळ चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित न राहता स्वताच्या बळकटी कारणावर भर द्यावे तसेच आपले आरोग्य कसे सुदृढ राहील याची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच कायद्याचे ज्ञान देखील आपल्याला असणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा आशा गंडाते, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक जयश्री कावळे, नगरसेविका नीता रणदिवे ,पूजा रामटेके ,वैशाली पुपरेड्डीवार, अपूर्वा चिंतालवार, अंजुताई भैसारे ,निमंत्रीता कोकोडे, शहर महिला अध्यक्ष प्रीतिताई सागरे, पुष्पां सिडाम तसेच सर्व आजी माजी अंगणवाडी सेविका मदतनीस सामाजिक कार्यकर्त्या तसेच सर्व नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांना तिळगुळ आणि वाण देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन जयश्री कावळे यांनी तर आभार स्वेता मोहूर्ले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नगर पंचायतच्या सर्व महिला कर्मचाऱयांनी अतिशय मोलाची मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here