prabodhini news logo
Home चंद्रपूर जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांच्यासह ब्रम्हपूरीतील शेकडो युवकांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांच्यासह ब्रम्हपूरीतील शेकडो युवकांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
139

काॅंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

ब्रम्हपूरी प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज

सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्य जनता, गृहिणी, शेतकरी, शेतमजूर यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. यामुळे युवकांचा कल मोठ्या प्रमाणात काॅंग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवर, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपूरी येथील शिवछत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष मोंटु पिलारे यांच्यासह ब्रम्हपूरी शहरातील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासह काॅंग्रेसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ब्रम्हपुरी येथील विजय वडेट्टीवार पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे यांसह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी विरोधी पक्षनेते नाम.विजय वडेट्टीवार म्हणाले कि, काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केलेल्या सर्व युवकांचे स्वागत असुन काँग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असतो. सोबतच युवकांनी सुध्दा आता सक्रियपणे राजकारणात येऊन नेतृत्व करीत समाजाची सेवा केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जगदीश उर्फ मोंटु पिलारे, रवी पवार, अतुल राऊत, सचिन कऱ्हाडे, प्रविण नंदनवार, आशिष मुळे, शुभम कावळे, सुरेश नरड, तारकेश्वर राऊत, विनीत मेश्राम, संदीप सोंदरकर, प्रणय बेदरे, अभय भागडकर, राजेश तलमले, निखील करंबे, अक्षय जांभुळे, श्रेयस कावळे, अविनाश भुर्रे, आशिष वंजारी, विनोद कराणकर, अक्षय कुथे, अमित सहारे, भुपेंद्र बेदरे, अनिकेत कान्हेकर, राकेश शेंडे यांसह शेकडो युवकांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here