prabodhini news logo
Home अमरावती समता सैनिक दल अमरावती युनिट व धामणगाव रेल्वे च्या वतीने जळगाव आर्वी...

समता सैनिक दल अमरावती युनिट व धामणगाव रेल्वे च्या वतीने जळगाव आर्वी तालुका धामणगाव रेल्वे येथे तातडीची भेट दिली

0
144

अर्पित वाहाणे
अमरावती प्रतिनिधी

अमरावती : धामणगाव काल दि. 21/1/2024 ला रात्री 08 :00 वा जळगाव आर्वी तालुका धामणगाव रेल्वे येथे पुनर्वसन नागरिकांना स्थायिक नमूद करून देण्यात यावे ग्रामपंचायतला मागणी करिता व शासनाला नागरिक व बौद्ध बांधवांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याकरिता आमरण उपोषणला बसण्याआधी समता सैनिक दल धामणगाव रेल्वे व अमरावती युनिट द्वारे मार्शल सुशील मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्शल निरंजन हेंदवे यांच्या मार्गदर्शनात त्या गावांमध्ये जाऊन तिथल्या स्थायिक बौद्ध बांधव व तेथील रहिवासी नागरिक लोकांना त्यांचे हक्क अधिकार व त्यांच्या समस्याचे समाधान करण्याकरिता जळगाव आर्वी येथे बौद्ध बांधवांना समता सैनिक दल अमरावती युनिट व धामणगाव रेल्वे च्या वतीने तातडीची भेट, मीटिंगमध्ये उपासक, उपासिका व तिथल्या पूरग्रस्त पुनर्वसन नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही तीस वर्षापासून त्यांना कुठलीच शासकीय मदत न मिळाल्या कारणामुळे शासनाचे हक्क अधिकार मिळावे व त्यांना पुनर्वसन करिता त्यांना त्यांची राहण्याची जागा उपलब्ध करून देण्याकरिता तेथील 17 कुटुंबीय बौद्ध बांधव व नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार शासना द्वारे मिळण्याकरिता समता सैनिक दल अमरावती युनिट दलाच्या वतीने जळगाव आर्वी येथे उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित मार्शल, मार्शल सुशील मेश्राम, मार्शल निरंजन संघराज, मार्शल ऍड आशिष हेंडवे, मार्शल सिद्धांत वाघमारे, मार्शल आशिष डोंगरे, मार्शल विकी शहापूर मिटिंग मध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here