तिरुमलेश कंबलवार
प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – आज सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी श्री. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होणार आहे.
त्या निमित्ताने मोसम येथील हनुमान मंदिर पासुन गावात सकाळी 11:30 वाजता शोभायात्रा काढण्यात आला या शोभायात्रेममध्ये सर्व रामभक्तांनी, सर्व मातृशक्ती, सहकटुंब, सहपरिवार, इष्टमित्रासह मोठ्या संख्येने सहभागी होते.
तत्पूर्वी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती सजवून पूजापाठ करत रॅली काढण्यात आली. त्या नंतर मोसम येतील हनुमान मंदीरात पुजा अर्चना आणि अन्नदान कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमात मोसम गावातील सर्व नागरिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

