
ऊर्जानगरात राष्ट्रसंत स्मृतिदिन महोत्सव संपन्न
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर : गाव कार्याने सुधारावे, भाषणाने नाही. गाव हेच मंदिर समजावे आणि गावातील लोक हेच सर्वेसर्व आहेत. गावाची, समाजाची सेवा करणे हीच पुजा आहे. गावाच्या परीवर्तनानेच देशाचा विकास होईल यासाठी गावात सामुदायिक ध्यान, प्रार्थना व रामधुन मिरवणूक हे उपक्रम सतत राबविणे गरजेचे आहे. गावाचे कल्याण साधण्यासाठी सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांनी सांगितली आहे. यातून विश्व कुटुंबाची संकल्पना साकार होईल असे महाराजांनी सांगितले आहे. ग्रामगीतेचा केंद्रास्थानी मानव आहे असे प्रतिपादन आत्मनुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांनी केले ते श्रीगुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने स्नेहबंध सभागृह येथे आयोजित वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा स्मृतीदिन महोत्सव निमित्य आयोजित राष्ट्रसंत व्याख्यानमाला व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
राष्ट्रसंत व्याख्यानमाला व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे प्रभारी मुख्य अभियंता श्याम राठोड तर अध्यक्षस्थानी कर्मयोगी तुकारामदादा विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर गोहणे होते. प्रमुख अतिथी अधिक्षक अभियंता दिनेश चौधरी, सुधाकर काकडे, मोरेश्वर मडावी यांची उपस्थिती होती.
दुपारी 4.58 ला वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरने श्रद्धांजलीपर भजन सादर केले. बौद्ध धर्माची प्रार्थना आयुष्मान मारोती साव, मुस्लिम धर्माची प्रार्थना शोभना शेख, ख्रिश्चनधर्माची पास्टर सुमंत जेनेकर आणि शिख धर्माची कुलदीपसिह जसवाल, शिवधर्म संजय जुनारे यांनी सांगितली.
सामुदायिक प्रार्थना व सर्वधर्म प्रार्थना यावर विचार व्यक्त करतांना सांगितले की, सत्य, ज्ञान, प्रेम याला स्वधर्म म्हणजे आत्मधर्म म्हटले आहे. अन्याय, अत्याचार, दुराचार याला परधर्म असे सांगितले आहे.
स्मृतिदिनाप्रसंगी आयोजित रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ग्रामगीता पठण, एकेरी गीत गायन, बाल व महिला खंजेरी भजन संमेलनाचे मान्यवराच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी वसाहतीतील सामाजिक व व्यसनमुक्तीच्या कार्यात योगदान देण्याऱ्या विनोद सूर, विजेंद्र तागडे, निलेश उपलोपवार, सुरेश दाते यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच गोंडवाना विद्यापीठातुन बॅचलर आफ फॅशन डिझायनिंगमध्ये प्रथम मेरिट आलेल्या कु.प्रिती कमलाकर दाते माजी शिबिरार्थी हीचा व सेवानिवृत्त सभासद राजीराम भजनकर ,सुधाकर काकडे यांचा ही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत उपाध्यक्ष रामदास तुमसरे यांनी मंडळातर्फ वर्षभर राबवत असलेल्या उपक्रमाचा अहवाल विषद केला. सुञसंचलन नाना बावणे यांनी केले व आभार बंडू कुळमेथे यांनी मानले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.














