
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले पेंढरी (कोके.) येथे ग्राम पंचायत मैदानावर ग्राम पंचायतच्या वतीने महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडले. सदर कार्यक्रम माजी सरपंच सौ.छबुताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व माजी सरपंच सौ. हिराताई बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पाहुण्यांचे स्वागत गावचे सरपंच तथा प्रथम नागरिक तारा अरविंद राऊत यांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक करतांना सरपंच तारा अरविंद राऊत म्हणाले की, खरे तर हळदी कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहेआपल्या भारतीय संस्कृतीची एक परंपरा आहे म्हणुन महिलेच्या आयुष्यात हळदी कुंकवाला फार महत्त्व आहे.
अध्यक्षीय भाषणात छबुताई शिंदे म्हणाल्या की, प्रत्येक महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहून महिला ही सक्षम आहे ते दाखवावे. कार्यक्रमाला माजी सरपंच हीराताई बनसोड उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत महिला सदस्या मामिता शेंडे, गीता भैसारे, नगिना आत्राम, मंदा चौखे व ग्राम पंचायत कर्मचारी सचिन शेंडे, विकास कराडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.संचालन ममिता शेंडे, आभार गिता भैसारे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता महिलांना वान वितरण करून करण्यात आले.














