prabodhini news logo
Home आंबेगाव मयत आदेश संदीप मिरके यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी मंचर पोलीस ठाणे चौकशीसाठी...

मयत आदेश संदीप मिरके यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी मंचर पोलीस ठाणे चौकशीसाठी सहा महिन्यापासून टाळाटाळ- मिरके कुटुंब यांचा आरोप

0
99

पुणे प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

पुणे, आंबेगाव – वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून मंचर पोलीस ठाणे विरुद्ध जन आक्रोश आंदोलन दिनांक १७/०१/२०२४ रोजी करण्यात आले व त्या आंदोलनामध्ये पीएसआय किरण भालेकर साहेब यांनी आंदोलन करते त्यांच्यासोबत चर्चा करून शब्द दिला होता की विषारी रिपोर्ट साठी आम्ही स्वतः कुटुंबांना घेऊन जाऊ व त्यांच्यासोबत खात्री करून घेऊ असं विधान केले. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व समाजाने शांततेची भूमिका घेऊन कायदेशीर बाब समजून किरण भालेकर यांच्यावर विश्वास दाखवण्यात आले, परंतु मंचर पोलीस ठाणे चे कर्मचारी सुमित मोरे, यांनी १८/०१/२०२४ रोजी संगीता ताई मिरके यांना मंचर शिवाजी चौक या ठिकाणी भेट घेऊन संगीता ताई मिरके यांना सांगण्यात आले की तुमच्या पोराचे केस खूप गंभीर आहे व जाब जबाब मध्ये “असं लिहा की सुमित मोरे यांच्याकडून केस काढण्यात यावी व त्यांच्या वरिष्ठाकडे ही केस सोपावी,

मयत आदेश मिरके यांच्या निर्गुण हत्या ला सहा महिने होऊन गेले आणि आज सुमित मोरे या केस पासून का दुरावतात याचे कारण काय आहे ?? आणि स्पष्ट विधान केले की या आदेश मिरके यांच्या केस मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत मला यातून बाहेर काढा ? त्यामुळे, संशयस्पद निर्माण होतो सुमित मोरे यांनी सहा महिन्यामध्ये काय चौकशी केली ?? विषारी रिपोर्ट साठी तारीख १८/०१/२०२४ व १९/०१/२०२४ तारीख सतत सुमित मोरे यांना संगीता ताई मिरके फोन करत आहे परंतु सुमित मोरे यांची पूर्णपणे टाळा टाळ चालू आहे व त्यांनी असं विधान व्यक्त केलं की “माझ्याकडे गाडी नाहीये तुम्ही तुमचे गाडी घ्या मग मी तुमच्याबरोबर विषारी रिपोर्ट बघण्यासाठी येतो गाडीत नसल्यास मला जमणार नाही” तुम्ही एसटीने जावा.

मयत आदेश संदीप मिरके यांची निर्गुण हत्या प्रकरणे ही केस दाबण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

१)सुमित मोरे यांनी संगीता ताई मिरके यांच्याशी चर्चा करून मयत आदेश संदीप मिरके यांची केस काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवावी असे मार्गदर्शन करण्यास हे अधिकार सुमित मोरे यांना कोणी दिले ??
२) मयत आदेश संदीप मिरके यांच्या निर्गुण हत्या मृत्यू प्रकारातून सुमित मोरे हे पळवाट का काढत आहे ??,
३) विषारी रिपोर्ट गणेश खिंड मधून चौकशी करण्याचे ड्युटी ही पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोरे यांचं आहे का ?? मिरके कुटुंबाची ??
संशयास्पद सुमित मोरे यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे निरीक्षक प्रदीप गौतम साळवे यांनी करण्यात आले व शिवाजी राजगुरू (आंबेगाव तालुका अध्यक्ष), दिपाली साबळे (आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा), पंकज सरोदे (तालुका उपाध्यक्ष), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव), साधू शेठ लवांडे (तालुका सल्लागार), संभाजी राजगुरू (तालुका सचिव), शुभम जेटके (तालुका सचिव), सुरेश रोकडे, अनिल गायकवाड (तालुका उपाध्यक्ष), धनेश राजगुरू (संपर्कप्रमुख), रोहिदास शिशुपाल (महाळुंगे संपर्कप्रमुख), गजानन राजगुरू, वीरेंद्र आल्हाट, आशुतोष लवांडे, आणि सर्व कार्यकर्ते व मिरके कुटुंब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here