हवामान आधारीत सल्ला पत्रकानुसार शेती पिकाचे व्यवस्थापन करावे. डॉ. अनिल कोल्हे

0
98

भेंडाळा येथे शेतकरी जनजागृती कार्यक्रम संपन्न

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे भारत मौसम विज्ञान विभाग, नवी दिल्ली पुरस्कृत ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पा अंतर्गत ‘शेतकरी जनजागृती कार्यक्रम’ दिनांक २४ जानेवारी २०२४ ला मौजा भेडाळा, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यांत आला. या जनजागृती कार्यक्रमामध्ये मा. डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, हे अध्यक्ष म्हणुन तर प्रमुख पाहुणे श्री. राजुभाऊ बन्सोड, सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, भेंडाळा हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून श्री. त्रिशरण गणवीर उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, भेंडाळा व श्री. श्यामसुंदर बन्सोड, प्रगतशील शेतकरी, भेंडाळा हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही व श्री. आशिष नागदेवे, संशोधन सहयोगी, ग्रामीण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही व श्री. धरमचंद गणविर वेदशाळा निरीक्षक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, सिंदेवाही हे होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यकमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री. आशिष नागदेवे, संशोधन सहयोगी, यांनी ग्रामीण कृषि मौसम सेवा या प्रकल्पाचे स्थापनेचा उद्देश, महत्व, कृषि हवामान सल्लापत्रक व कार्य तसेच मेघदूत व दामीणी या हवामान तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात धान पिकावरील एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन, धान पिकामधील पट्टा पध्दत, उन्हाळी भुईमुंग या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, धान पिकामध्ये यांत्रिकिकरणाचे विविद्य कृषि यंत्र अवजारे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले सोबतच रॉयझोबयिम, पिएसबी, अॅझाटोबॅक्टर या जैविक बुरशिनाशकाचा वापर करावा. धान शेतीकरीता लागणा-या खर्चात बचत करण्यासाठी यांत्रिकिकृत शेती अवलंब करून उत्पादकता वाढवावी असे आवाहन केले.

डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी शेतक-यांनी विद्यापीठ संशोधीत दान वाण जसे की, पीडीकेव्ही तिलक, पीडीकेव्ही साधना, सिंदेवाही -२००१, पीकेव्ही एचएमटी, पीडीकेव्ही साकोली रेड राईस-१ व सिंदेवाही -१ या वाणांचाच शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा असे सुचविले.

डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी धान शेतीवर अवलंबून न राहता भाजीपाला, कुकुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय असे जोडधंदे करावे. सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, भेडाळा ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषि संवादिनी-२०२४ चे वाटप करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचालन धरमचंद गणविर यांनी केले तर आशिष नागदेवे यांनी उपास्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here