कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश ढोक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुरमाडी च्या सरपंच रुपाली रत्नावार, उपसरपंच नीलकंठ जांभुळे, ग्रा. प. सदस्य वैभव रत्नावार, करुणा मसराम ऊपस्तिथ होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश मेश्राम यांनी प्रास्ताविक सादर करून शाळेच्या प्रगतीची माहिती दिली.
अनेक विद्यार्थ्यानी भाषणे सादर केली, सरपंच रुपाली रत्नावार यांनी तंबाखू विरोधी शपथ वाचन केले तसेच नीलकंठ जांभुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या देशभक्ति विषयी माहिती दिली. अनेक विद्यार्थ्यानी देशभक्ति पर गीतावर नृत्य सादर केले. तसेच लहान मुलांनी मनोवेधक मनोरे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश बन्सोड यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली ज्ञानवल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रेमी चंदू भेंडारे,योगेश गेडाम, विनोद भेंडारे, विलास आळे, आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

