तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज़- आज दिनांक 23 जून 2025 रोजी जिल्हा परिषद (मा. शा.) हायस्कूल तसेच विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथे शैक्षणिक सत्र 2025-2026 साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक लेझीम वादन व पुष्पगुच्छ देऊन आनंदात स्वागत करण्यात आले.
तसेच नवोदय विद्यालयात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. एन. आर. मरस्कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण तोंबर्ला, उच्च श्रेणी शिक्षक ए. डब्ल्यू. सोनेकर, के. वाय. जगदाभी, एस. एस. मादेशी, के. एन. हलामी, एस. पी. येलपूला, जनबंधू, अमित भांडेकर, रणदिवे, तसेच इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी योग्य दिशा व प्रेरणा देण्यात आली. शाळेचे शिस्तबद्ध नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना एक ठोस ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनतीने ज्ञानार्जन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले.

