
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
Chandrapu- दि 30/01 आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर “आक्रोश मोर्चा” काढून सरकारचे लक्ष वेधले आहे.
अजित फाटके, कार्यकारी अध्यक्ष, आप, महाराष्ट्र:- हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे.
देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे.
आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत
१. सदोष “तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात
२. नोकभरती परीक्षेत झालेल्या “पेपरफुटी”ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली “विशेष चौकशी समिती”ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा
३. पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना “जन्मठेपेची शिक्षा” व रु. १० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.
५. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य द्वारे घेण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी तसेच आप नेता सुनील देवराव मुसळे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज शाह, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, जिल्हा सचिव प्रशांत शिदूरकर, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, सिकेंदर सागोरे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्या, जिल्हा अध्यक्ष सहकार आघाडी मधुकर साखरकर, अशोक माहूरकर, सुमित हस्तक, जितेंद्र भाटिया, अनिलकुमार राम, निखिल जट्टलवार, सुजित चेडगूळवार, राहुल चौहान, सुनील भोयर, संघम सागोरे, विकी मंडल, प्रशांत मेश्राम, स्वप्नील घाघरगुंडे, अलंकार सवलकर, आदी साव, राहुल डोंगे, समीर मेश्राम, सुदेश भालेकर, अनुप तेलतूमडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














