prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

0
102

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाला काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पारधी, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष कल्पनाताई गेडाम, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष सोहेल सय्यद, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर झरकर, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, शहर काँग्रेस कमिटीचे सहसचिव सोमेश्वर उपासे, तालुका काँग्रेस कमिटीचे सहसचिव नेताजी पिसे, वांद्रा उपसरपंच गुरूदेव वाघरे, गांधीवादी विचारवंत संदीप कटकूलवार, कार्यालयीन कर्मचारी अमोल सलामे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उपस्थित मान्यवर म्हणाले की, गांधीजींनी शस्त्र न उचलता इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. त्यांचे विचार हे त्याची तलवार आणि ढाल दोन्ही होते.
महात्मा गांधी म्हणायचे जगताना असे जगा की तुम्ही उद्या मरणार आहात आणि शिक्षण मात्र असे घ्या की तुम्ही जसे अमर आहात. भिती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याचा आजार आहे. विचार नेहमी तर्कवादी असावेत मात्र विश्वासघातकी नसावेत. आणि विश्वास आंधळा झाला की मरण पावतो. काम कोणतही असुद्या त्यात प्रेम असाव अन्यथा ते न केलेल केव्हाही उत्तम. आनंद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही जो विचार करता तो अंमलात आणता तेव्हा. शहाणा माणूस विचार करुन कृत्य करतो आणि मुर्ख माणूस कृत्य करुन झाल्यावर विचार करतो असे महात्मा गांधी म्हणायचे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here