भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज विद्यालय बावणे चिंचोली येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

0
67

उमेश एखडे
बुलडाणा प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज विद्यालय बावणे चिंचोली येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करुन स्वागत गीताने कार्यक्रमाची सर्वात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार बुलढाणा जिल्हा सुखदेवराव काळे, डॉ. सुनिल कायदे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आर खरात अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज विद्यालय बावणे चिंचोली, तर स्वागताध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आर बी काळे सर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये आजू बाजूच्या जिल्हा परिषद शाळेने व इंग्लिश स्कूल ने सहभाग घेतला होता मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळांना सन्मान चिन्ह व स्पर्धकांना पत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शाहू महाराज विद्यालय बावणे चिंचोली सर्व कर्मचारी यांनी केले होते विद्यार्थ्याच्या प्रगती साठी संस्थेतील प्रत्येक शिक्षकाने मैत्री पूर्व वातावरण निर्माण करुन भावी देशाचे आधारस्तंभ निर्माण करण्यासाठी सतत पर्यन्त करत राहावे.

यावेळी माजी खासदार बुलढाणा जिल्हा सुखदेव काळे, माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ. सुनील कायदे, सभापती विठ्ठल राठोड, संस्थेचे अध्यक्ष पी. आर. खरात, सचिव मंदाकिनी खरात, सरपंच भगवान पालवे, बळीराम मोरे, सुशील खरात, मधुकर उबाळे, राजू साळवे, हरिंद्र कमिठे, पुस्फा साळवे या सह शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य काळे तर आभार प्रदर्शन काकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here