उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुल तालुक्यातील सुशी दाबगाव गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून जड वाहतुकीमुळे व प्रदूषणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा 9 फेब्रुवारीला गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा उलगुलान समघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे. तसे निवेदन मूल येथील तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
गडचिरोली येथील सुरजागड येथील लोहखनिज उत्पादन करणाऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या गावातून दिवसरात्र आयरणची जड वाहतूक सुरू आहे.त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावातील शाळा, अंगणवाडी, रुग्णालय व परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले.त्यांनतर राजू झोडे यांना याबाबत सांगितले असता त्यांनी तात्काळ नागरिकांना सोबत घेऊन मूल येथील तहसीलदार यांना निवेदन दिले.तसेच जड वाहतुक व प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास 9 फेब्रुवारीला गावकर्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी विनोद शेन्डे, पाटिल वाळके, श्रीकृष्णा सोमनकर, मंगेश कवार, दुशांत सातपुते, नितु आत्राम, कृत्रिक सातपुते, किशोर आत्राम, पंचशील तामगाडगे, जयेश बुरांडे,अमोल बावणे, रुपेश कोढारे,आदि गांवकरी उपस्थित होते

