दिंडोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
राजेंद्र दत्तात्रय ऊफाडे उपसरपंच वरखेडा यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गणपतराव पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश जी वडजे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती सदू आप्पा शेळके, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश मामा कळमकर, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत आप्पा कड, उपसभापती कैलास जी मावळ, कोचरगाव गटाचे माजी सदस्य अशोक टोंगारे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सोनजांब चे सरपंच वसंतराव जाधव, पाडे गावचे सरपंच नरेंद्र पेलमहाले, उमराळे चे माजी सरपंच संजय केदार ,मातेरवाडी चे माजी सरपंच दत्तात्रय गटकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णा मातेरे, जयवंत जाधव, नितीन भालेराव, तुषार वाघ यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

