
उमेश एखंडे
बुलडाणा प्रतिनिधी
आज सिंदखेड राजा येथे अखील भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्व आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस अभिवादन करण्यात आले यावेळी अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी स्व आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जीवन प्रवास थोड्यक्यात व्यक्त केला क्रांतिसूर्याच्या_अकाली_अस्ताने_इतिहास_अर्धवटच..२००३-४ च्या दरम्यान महाराष्ट्रात एक झंझावात वाहत होता आणि तो होता अण्णासाहेबांच्या रूपाने. छावा ची स्थापना करून गावातील दबंग पोरांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले होते. जी पोरं त्यांच्यासाठी मारायला आणि मरायला तयार होती. जी पोरं टवाळक्या, गुंडागर्दी, भांडण-तंटे यात पहिल्या हाताला असायची अशा पोरांच्या मनात समाजाप्रती समर्पणाची ज्योत पेटवली व त्यांच्या धाडसाचा उपयोग त्यांनी संघटन आणि समाजासाठी केला. त्यांना ‘जय छावा’ च्या एका शब्दात बांधले. हा जय छावा चा जयघोष महाराष्ट्रभर घुमू लागला. हजारो तरुणांनी अण्णांना डोक्यावर घेत आपलं सर्वस्व मानलं. त्याचं कारण होतं अण्णासाहेबांचं व्यक्तिमत्व. प्रचंड धाडस, कुणालाही भिडण्याची तयारी, आक्रमक भाषण कौशल्य, मजबूत संघटन कौशल्य आदी ग्रामीण नेता म्हणून जे गुण लागतात त्यांचा खजिना त्यांच्याकडे होता. त्यांच्या रूपाने मराठा समाजाला एक आक्रमक चेहरा व छाव्याना दिशादर्शक मिळाला. महाराष्ट्रात छावा स्टाईल आंदोलनाची एक आक्रमक स्टाईल उदयास आली. ग्रामीण भागात शिवसेनेसारख्या कडवट संघटनेला शह देत छावा जोरदार मुसंडी मारू लागली, इतकी की काही मतदारसंघात अण्णांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमदार होणे श्यक्य नव्हते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले होते. पण त्यांच्या कार्याची पद्धत कायम आक्रमकच असायची. आर्थिक निकषावर सर्व समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची भूमिका इतर समाजातील गरिबांविषयीही सकारात्मक भावना व्यक्त करणारी होती. कायदेशीर दृष्टीकोणातून ते श्यक्य नव्हते ही बाब वेगळी. कमी वयात त्यांचं अनंतात विलीन होणं, हे समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. ज्याचे परिणाम आजही समाज भोगतो कदाचित अण्णा आज असते तर महाराष्ट्रातील किमान मराठवाड्यातील राजकीय व सामाजिक परिस्थिती काहीशी वेगळी असती. कारण सक्षम संघटनानंतर घेतलेली राजकीय भूमिका किती प्रभावी ठरली असती याचं उत्तर अनुत्तरीतच राहिलं. हजारो निष्ठावान छावे पोरके तर झालेच पण त्यांच्या आयुष्याला वळण देणारा स्तंभ गेला. तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे नंतर अण्णासाहेब च आक्रमक व कडवट संघटनेचं नेतृत्व करत होते. आणि तसा जनाधारही त्यांच्या पाठीशी होता. कित्येकांचे गडकिल्ले उध्वस्त करणाऱ्या व कित्येकांची घरं बसवणाऱ्या त्यांच्या शब्दांची धार इथल्या मातीने अनुभलीय. आज जो मराठा आरक्षणाचा खेळ झालाय यावर ते नक्कीच वाघासारखे तुटून पडले असते. सर्वच प्रश्न कायद्याने सुटत नसतात वेळप्रसंगी तलवार व दंडुके हातात घ्यावी लागतात ही अण्णासाहेबांची शिकवण होती.त्यांच्या रूपाने एक नेतृत्व उदयास येत होतं, जे कदाचित इथल्या मागील २ दशकांचा इतिहास बदलवण्याची क्षमता बाळगून होतं. त्यांच्या ज्वलंत नेतृत्वाचा उगम होऊन चढता क्रम होता, परंतु वेळेच्या आतच सूर्यास्त झाला. त्यामुळे सूर्यास्ता आधीचा इतिहास अर्धवट व अनुत्तरीतच राहिला. त्यांचे छावे चळवळ मात्र नेटाने पुढे नेत आहेत. ‘जर अण्णा असते तर.’ या कल्पनेत संघटनेने कार्य न करता त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र परिश्रम केले पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. त्यांची सर येणार नाही हा भाग वेगळा त्यांच्या अकाली अस्ताने इतिहास अर्धवट राहिला. अर्थातच लिहिल्या जाणाऱ्या इतिहासाची पानं कोरी राहिली. हीच भावना आज आरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. ‘मराठ्यांचे क्रांतिसूर्य’ ही कार्यकर्त्यांनी व समाजाने दिलेली उपाधी खऱ्या अर्थाने त्यांना शोभायची. कारण त्यांचं आयुष्य धगधगत्या ज्वाळा सारखेच होते यावेळी राहिलेली शिवजयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर केली असुन शहर व ग्रामीण सचिव पदी संदीप देशमुख तर उपाध्यक्ष पदी सागर खांडेभराड, सदस्य पदी दीपक शेळके याचे नियुक्ती अध्यक्ष डॉ बालासाहेब पाटील कळकुंबे यांनी जाहीर केली यावेळी अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बालासाहेब पाटील कळकुंबे,सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष अ भा छावा बाळासाहेब पाटील, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष शिवभाऊ पुरंदरे, मनसे अध्यक्ष निलेश देवरे, मनसे शहरध्यक्ष अभिदादा देशमुख, माजी अध्यक्ष छावा रामेश्र्वर काकडे, राष्ट्रवादीचे नेते संदीप देशमुख , युवासेनेचे युवा नेते दिपकराव शेळके पाटील, गायकवाड पाटील, परसराम शेळके, भाजपाचे युवक नेते अजिंक्य शेळके, दत्ता कळकुंबे, एकनाथ म्हस्के, चेतनभाऊ झाल्टे, छावा नेते अमोल एखंडे, सामाजिक कार्यकर्ते उध्दव एखंडे पाटील, या सह अनेक शिवभक्त उपस्थीत होते.














