देवणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
देवणी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी निलंगा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन पीडित कुटुंबियांना धीर दिला व त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी न्याय देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन मानकरी सावकार, डीसीसीचे संचालक दिलीपजी पाटील नागराळकर, वलांडीचे राम भंडारे, अशोक पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष लालाभाई पटेल,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,बबलू जाधव, बाळासाहेब देशमुख व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

