
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिदेवाही येथील संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत दोन गटात लढत झाली त्यात एकता पॅनल चे सर्व तेरा उमेदवार निवडून आलेत. त्यात सुनिल उईके, रत्नाकर कामडी, प्रशांत खोब्रागडे, प्रशांत घुटके, गिरीधर नगरे, ओमप्रकाश बावणकुळे, सुनिल लोनबले, टिकेश्वर शिवनकर, राजकुमार पाटील, रेवनाथ चिमुरकर, सज्जन तेलकापलीवार, अल्का भुते, मंदाकीनी हटवार हे विजयी झालेत.
या मधुन अध्यक्षपदी सज्जन तेलकापल्लीवार तर उपाध्यक्ष पदी गिरीश नगरे ,सचीव राजकुमार पाटील, खजीनदार अलका भुते, गटनेता टिकेश्वर शिवनकर यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. यांचे निवडीने सर्व शिक्षकानी स्वागत केले.














