prabodhini news logo
Home चंद्रपूर खरबी येथे रंगला ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम

खरबी येथे रंगला ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम

0
106

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

ब्रम्हपुरी तालुक्यातील खरबी येथे राम भरोसे क्रिकेट क्लब खरबी/खेड मक्ता यांच्या सौजन्याने क्रिकेटप्रेमिंसाठी भव्य रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरज मेश्राम शहर अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी उपस्थित होते. उपाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. कुंदन दुफारे, सहउद्घाटक म्हणून सुरज शिवणकर सामाजिक कार्यकर्ता चौगान उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रितीताई धोंगडे पो.पा. खरबी, रेखाताई लाडे अंगणवाडी सेविका, मंदाताई गुरणुले माजी सरपंच खेड, धनराज शिवणकर, लीलाबाई सोरते, दिपक देशमुख उपसरपंच खेड, दीक्षाताई भजणकर सरपंच खेड, भोजराज बारसागडे, लुकेश सेलोकर, हरीश सोरते, कमलेश मुळे, मुरली सावसकर, सुनील करकाडे, उदाराम नागोसे, दिनेश लाडे, लेकानंद मेश्राम, भोजराज बारसागडे, लोकेश सेलोकर व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, ग्रामीण क्रिकेट स्पर्धा स्थानिक सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. तरुण पिढीला संतुलित आणि सकारात्मक दिशेने मार्ग दाखवतो. ग्रामीण भागात क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि खेळाच्या माध्यमातून समाजातील साक्षरता वाढवणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे. सोबतच तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनवणे हा अश्या स्पर्धांचा मुख्य उद्देश असला पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सदर स्पर्धा ही लीग स्परुपाची असणार आहे. एका गावातील एकच संघ स्पर्धेत भाग घेऊ शकते. या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार व माजी नगरसेवक नितीन उराडे यांच्याकडून 31 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 21 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांच्याकडून 11 हजार रुपये रोख देण्यात येईल. सोबतच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कवरड्राइव्ह, बेस्ट किपर, प्रथम हॅट्रिक, बेस्ट फिफ्टी, बेस्ट अंपायर असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here