prabodhini news logo
Home ठळक बातम्या अखेर सेलू येथे महेश डोंगरे पाटील व अशोक राजे जाधव छावा संघटनेच्या...

अखेर सेलू येथे महेश डोंगरे पाटील व अशोक राजे जाधव छावा संघटनेच्या माध्यमातून बस पोहचली

0
161

सेलु येथील सर्व गावकऱ्यांनी पुरुष व महिला सर्वांनी उत्साहाने स्वागत केले

उमेश एखंडे
बुलडाणा प्रतिनिधी

सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड राजा ते सेलू येथे बस चालू झाली आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कर्मचारी यांचे गांवकरी मंडळी वतीने स्वागत केले एसटी चा आजपासून प्रारंभ झाला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजे अशोकराव जाधव यांच्या माध्यमातून आणि गांवकरी मंडळी सहकार्याने आज गावात बस येऊ शकली सिंदखेड राजा हे शहर राजमाता जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेल शहर आहे सेलू हे गाव विदर्भातील सीमेवर असलेल्या गाव आहे गावात बस चालू झाली मराठवाड्याचे काही भाग , व गावातील नागरिकांना आनंदाची व प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली,गावातील नागरिकांना असे वाटत होते की भारत स्वंतत्र झाला पण गाव स्वंतत्र झाला नाहि आहे, आता गावात बस सुविधा झाल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना पायी जाण्याची वेळ येणार नाही व वयस्कर व्यक्ती सुद्धा चाल्या जात नव्हते त्यांना सुद्धा पायी जाण्यासाठी पायी भोसा या गावात जाने लागत असे पण आता त्यांना सुधा सोपे झाले सिंदखेड राजा ते सेलू बस चालू झाली आता मराठवाडा आणि गवतील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात फायदाच होईल खूप सुविधा उपलब्ध होईल.येथील रस्तावर खूप झाडे व गट्टे पडले होते रस्तयाची खूप दुरवस्था झाली होती गेल्या १५ वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती प्रशासनाला वार वार सांगूनही प्रशासनाच्या निदर्शनास आले नव्हते पण राजे अशोकराव जाधव यांच्या ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ रस्त्याचे दुरुस्ती कामं करुन गावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालू केली सेलू हे गाव विदर्भ आणि मराठवाडा च्या सीमेवर असलेल्या गाव आह स्वंतत्र झाला पण सेलू गावातील नागरिकांनी ह्या गावाचा विकास होत नसल्यामुळे गाव विक्रीला काढण्याची परवानगी मुख्यमंत्री यांच्याकडं घेणार होते गावकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने गावाचा विकास होत आहे असे वाटत आहे अशोक राजे जाधव म्हणाले की गावकऱ्यांनी साथ दिली तर सेलू गाव सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे विकासाबाबत विकास करू गावातील नागरिकांना कोणत्याही अडचणी असो ट्या अडचणीचा नक्की आपण कायदापलत करू आणि गावाचा विकास करू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या गावात बस येत नव्हती पण आपण आता ती पण आली आपण आजूनही तुमच्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू यावेळी अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजे अशोकराव जाधव छावा नेते संजय उगले, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके पाटील , सुदामराव पाटील कळकुंबे, सामाजिक कार्यकर्ते उद्धवभाऊ एखंडे पाटील ,गावाचे उपसरपंच आबासाहेब एखंडे, पोलीस पाटील आणासहेब एखडे , ग्रामपंचायत सदस्य आत्माराम एखंडे, बाबासाहेब एखंडे, एकनाथ खंदारे, नारुदादा रंधवे, बापूराव एखंडे, दिपक एखंडे, , माणिक रंधवे , नागोराव एखंडे,ज्ञानदेव एखंडे, गजनान एखंडे, नरहरी एखंडे, छावा नेते अमोल एखंडे, गावातील महिला मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या या सह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here