प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी-शहरात नर्सिंग महाविद्यालय नर्सिंग चे शिक्षण घेत असलेली विध्यार्थिनी कु. ऋतुजा सहजराव हिने प्रजासत्ताक दिनी रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृहात ध्वजारोहण कार्यक्रमात सुंदर गळ्यात तथागत गौतम बौध्द व देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थित मान्यवर व सर्व विध्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून सर्वांचे मने जिंकली. सुंदर गळ्यात गीत गाईल्या बद्दल कु. ऋतुजा सहजराव हिचा कार्यकामाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी समाज कल्याण निरीक्षक एच.ए. सय्यद यांच्या हस्ते पेन रुपी बक्षीस देऊन तिचे कौतुक करत सम्मान करून पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी एच.ए.सय्यद साहेब, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव प्रमोद अंभोरे, संदीप वायवळ, प्रकाश वडधुतिकर, ईशा घोंगडे, रमाताई घोंगडे, पत्रकार दिलीप बनकर, शेख अझहर, विकास भालेराव, नारायण अंभोरे व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

