वायगाव येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
71

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ब्रम्हपुरी प्रतिनिधी

ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगाव येथे कॅटर्स क्रिकेट क्लब वायगाव यांच्या सौजन्याने क्रिकेटप्रेमिंसाठी भव्य हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरूदेव तुपट सरपंच वायगाव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रभान चौधरी अध्यक्ष तंमुस, संतोष श्रीरामे पोलिस पाटील, सदानंद शेंडे ग्रा.पं.सदस्य, दिनेश काटलाम रोजगार सेवक वायगाव, भोजराज मानगुळदे, डॉ. उके, मारोती श्रीरामे, सुधाकर नन्नावरे ग्रा.पं.सदस्य, उत्तम श्रीरामे, किर्तेश बुल्ले व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागात एकोपा निर्माण होत असतो. तरुणांमध्ये नवचेतना व उल्हास निर्माण करणारी ठरत असते. तरुण पिढीला संतुलित आणि सकारात्मक दिशेने मार्ग दाखवतो. ग्रामीण भागात क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि खेळाच्या माध्यमातून समाजातील साक्षरता वाढवणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कॅटर्स क्रिकेट क्लब वायगाव यांच्या सौजन्याने आयोजित भव्य हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधे तालुक्यातील अनेक गावातील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here