ब्रम्हपुरी येथे ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांची बैठक संपन्न

0
50

रविंद्र मैंद
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

स्थानिक केंद्र (बूथ) पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व सर्व गावांतील बुथ कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 12 वा. कमलाई निवासस्थान ब्रम्हपुरी (विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचे निवासस्थान) येथे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी तालुक्यातील सर्व गावांतील ग्राम काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या आढावा बैठकीला प्रामुख्याने ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, ऍड. गोविंदराव भेंडारकर राष्ट्रीय समन्वयक काँग्रेस ओबीसी विभाग, कृ.उ.बा.स.ब्रम्हपुरीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी पं.स. सदस्य थानेस्वर कायरकर, सौ. मंगलाताई लोनबले अध्यक्षा तालुका महिला काँग्रेस कमिटी, सोनू नाकतोडे अध्यक्ष युवक काँग्रेस ब्रम्हपुरी विधानसभा, प्रमोद मोटघरे संचालक कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी, नामदेव लांजेवार उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, प्राचार्य डी. के.मेश्राम तालुका समन्वयक विजयभाऊ जन सेवा केन्द्र, सौ. स्मिताताई पारधी माजी जि.प. सदस्य, अमीत कन्नाके उपाध्यक्ष युवक काँग्रेस ब्रम्हपुरी, सौ. सुनीताताई तिडके उपसभापती कृ.उ.बा.स.ब्रम्हपुरी, भावनाताई इरपाते माजी जि.प. सदस्य, योगीताताई आमले अध्यक्षा शहर महिला काँग्रेस कमिटी, लताताई ठाकूर माजी नगरसेवक, वनिताताई अलगदेवे माजी नगरसेवक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीमधे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी तालुक्यातील सर्व गावांतील बुथ कमिट्यांचे पुनर्गठन करण्यात आले. सोबतच जानेवारी महिन्यातील विजयदुतांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना घराघरापर्यंत काँग्रेसचे विचार प्रभावीपणे पोहचविण्यासाठी तसेच पक्ष मजबुती साठी कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्राम काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना बूथनिहाय मतदार यादी पुरविण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष पिलारे यांनी केले तर आभार ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सर्व गावांतील ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सोशल मीडिया प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here