देसाईगंज नगरपरिषदने अतिक्रमित घरावर चालवला बुलडोझर

0
56

रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

देसाईगंज मधील विश्रामगृहापासून आंबेडकर शाळेकडे जाणारा रस्ता मंजूर असताना त्यामध्ये खूप दिवसापासून अतिक्रमण करून घर बसविले होते परंतु राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सदर रोड 700 मिटर मंजूर असून 500 मिटर रोड बांधकाम पूर्ण करण्यात आला त्यापैकी 200 मिटर वर 12 घरांचे अतिक्रमण असल्याने सदर काम करण्यात अडचण निर्माण होत होती.सदर रस्त्याला निविदा रक्कम दोन कोटी ८२ लाख रुपये कंत्राट रक्कम दोन कोटी तीस लाख रुपये या पद्धतीने राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील रक्कम मंजूर करण्यात आली होती. यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार नगरपरिषद ने सदर 12 घरावर आज बुलडोजर चालवला 10 ते 11 मीटर रुंदी अतिक्रमण काढण्यात आला.या रोडवरील 12 मीटर डीपी रोड मंजूर आहे यामुळे देसाईगंज नगरपरिषद ने कारवाई केली असल्यामुळे सदर रस्ता आता सुखकर होऊन देसाईगंज नगरपरिषदेतील रहिवासी्यांना हा मार्ग सुखकर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here