सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर
आज श्रीगोंद्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल यांची मराठा आरक्षण मिळाल्याने संबोधित करण्यासाठी सभा आयोजित केली आहे या सभेला लाखो मराठा उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात आई जिजाऊ व शिवाजी महाराजांचा पोवाडा शाहिर अरविंद गोगरे यांच्या गोड आवाजाने झाली यावेळी मनोज जरांगे पाटलांचे स्वागत जे सि बि मधुन गुलाब पुष्प टाकून झाले प्रथम मनोज पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन पुष्प वाहिले लाखो मराठा समाजाला संबोधित करताना मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे कोण म्हणतो आम्ही ओबीसी मधुनच आरक्षण मिळणार आहे मिळाले आहे सरकार म्हणतं होते की सरसकट नको पण मी सर्वांना आरक्षण मिळवण्यासाठी आग्रही होतो सगेसोयरे या शब्दाचा वापर करून आपणा सर्वांना आरक्षण मिळणार आहेत आपला उद्देश मुंबई ला जाण्याचा वाईट नव्हता त्यांनी सांगितले की पंच्याहत्तर वर्षीनी सगेसोयरे चाआरक्षणाचा कायदा आला त्यांनी सांगितले की आपला आग्रह हा सगेसोयरे चा आरक्षण मिळवण्यासाठी मुंबई ला गेलो होतो व घेऊनच आलोय आपला लढा हा गोर गरीब जनतेसाठी होता विधानसभेत आरक्षण चा कायदा पास होईल ते म्हणाले की मी रायगडला जाऊन कपाळी महाराजांचा अंगारा लाऊन आलोय
जरांगे पाटिल म्हणाले कि दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा व सगेसोयरेचे आरक्षण एक मताने मंजूर करा पंधरा तारखेला हा मसुदा विधानसभेत मांडण्यात येणार आहे तरी सर्व आमदारांनी एक मताने मंजूर करा त्यांनी छगन भुजबळ यांना अव्हान केले की आम्ही ओबीसी च्या गोर गरीबांना त्रास देणार नाही व ते जे पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांला आव्हान केले कि तुम्ही त्यांना आवरा नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील तसेच त्यांनी मराठा बाधवानां विनंती केली की आपण ओबीसी बांधवा बरोबर गुण्यागोविंदाने एकत्र राहा मी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ऊद्या पासून अमरण उपोषण करणार आहे ते म्हणाले की मी माझ्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करत आहे तरुणांना वेसना पासुन दुर राहण्याचे आवाहन केले समाजाची एकजूट कायम राहावी म्हणून विनंती केली आपल्याला शांतपणे लढा द्यायचा आहे शेवटी म्हणाले माझा जीव गेला तरी मी माघारी फिरणार नाही.

